Published On : Sat, Nov 7th, 2020

प्रतापनगर जलकुंभावर ९ नोव्हें रोजी शटडाऊन

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील राहणार बंद

नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी सोमवार ९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजतापासून प्रताप नगर जलकुंभाची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्याचे ठरविले आहे.

यादरम्यान खालील भागांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच प्रताप नगर जलकुंभावरून टँकरपुरवठादेखील बंद राहील. येथे उल्लेखनीय आहे कि, शहराची पाणीपुरवठा यंत्रणा चालविणाऱ्या मनपा-OCWचा पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी जलकुंभ स्वच्छतेवर विशेष भर आहे. यासाठी मनपा-OCW स्व-विकसित प्रणालीचा उपयोग करून दरवर्षी शहरातील सर्व जलकुंभ स्वच्छ करत असतात.

Advertisement

प्रताप नगर जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

Advertisement

सिंधी कॉलोनी, व्यंकटेश नगर, कोतवाल नगर, मिलिंद नगर, हावरे लेआऊट, रवींद्र नगर, टेलिकॉम नगर, पूनम विहार, दीनदयाळनगर, सरस्वती विहार, लोकसेवा नगर, सरोदे नगर, खामला जुनी वस्ती, शास्त्री लेआऊट, स्वरूप नगर, त्रिशरण नगर, NIT लेआऊट, शांतीनिकेतन कॉलोनी, सेन्ट्रल एक्साईज कॉलोनी, श्याम नगर, गौतम नगर, शिव नगर.

नागरिकांना होणाऱ्या गैरसोइबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

For any complaints about water supply please contact OCW Toll free number: 1800 266 9899 and for any query visit OCW Website @: www.ocwindia.com

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement