Published On : Wed, Jul 22nd, 2020

श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम- श्रीमती माणिक काशीकर यांचे प्रतिपादन

विज्ञान शाखेचा निकाल 100% *कला शाखेतून कु. श्वेता गंगाधरराव मोटघरे हिला ८४ % गुण प्राप्त करून प्रथम *प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार

रामटेक-श्रीराम शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला व कला शाखेचा निकाल 84. 21 % लागला श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व पदाधिकारी यांनी प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार केले. विज्ञान शाखेतून कु. नंदिनी नंदकिशोर रहाटे हिला 76.66% तर कु.श्रावणी उमाकांत पोफळी 76.61, व हर्ष विष्णुजी धावडे याला 75.38 %गुण मिळाले.

कला शाखेतून कु. श्वेता गंगाधरराव मोटघरे हिला 83.38 % गुण प्राप्त झाले व ती संपूर्ण रामटेक तालुक्यातून कला शाखेतून प्रथम आली अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असताना हिने यश संपादन केले कु. किरण देवराव गाडापेले 76.92% कु.शितल राधेशाम सुहागपुरे 74.15% गुण मिळाले. कु. संध्या ओमकार मडाये 74.15% गुण प्राप्त केले. विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्थेच्या सदस्या श्रीमती माणिक काशीकर, मॅडम नवनियुक्त मुख्याध्यापक व प्राचार्य मोहन काटोले निमंत्रित पाहुणे कनिष्ठ महाविद्यालयचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमती काशीकर मॅडम यांनी संस्थेने विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासाठी विद्यार्थ्यांचा मागणी वरुन ज्यु. काॅलेज विज्ञान शाखा, कला शाखा बी.एस.सी.काॅलेज उपलब्ध केल्या. व निरंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करण्याचे एकमेव उद्दिष्ट ठेवून आपण वाटचाल करत आहोत असे प्रतिपादन केले. प्राचार्य तथा सर्व सन्माननीय शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संचालन सौ. निता सपाटे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.मिनाक्षी दातीर ,राहुल गवई ,बबलु यादव ,दिनेश टांगले ,सौ.निलिमा लुटे सौ.रुपाली मानेकर यांनी प्रयत्न केले.