Published On : Tue, Jun 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील श्री टेकडी गणेश मंदिराकडून देणगी फसवणुकीबाबत इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Advertisement

नागपूर: श्री टेकडी गणेश मंदिर ट्रस्टने नागरिकांना इशारा दिला आहे की, मंदिराच्या नावाने काही फसवेखोर व्यक्ती सदस्य नोंदणी शुल्क आणि देणग्या गोळा करत आहेत. मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले आहे की अशा कोणत्याही व्यक्तीला मंदिरातर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेले नाही.

मंदिराचे सचिव दिलीप शहाकार यांनी अधिकृत पत्रकातून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मंदिर ट्रस्टकडून कोणालाही आर्थिक व्यवहार किंवा देणगी संकलनाची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणतीही नोंदणी फी अथवा देणगी कोणालाही देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहाकार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा फसवणुकीच्या घटना आढळल्यास तत्काळ मंदिर प्रशासनाला कळवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. अशा फसवणुकीमुळे मंदिर ट्रस्ट कोणत्याही आर्थिक किंवा इतर नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंदिर प्रशासनाकडून नागरिकांना विनंती-

कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून नोंदणी किंवा देणगीसाठी पैसे देऊ नयेत.

मंदिराच्या अधिकृत कार्यालयातच सर्व व्यवहार करावेत.

फसवणुकीची शंका आल्यास लगेच मंदिर ट्रस्टशी संपर्क साधावा.

श्री टेकडी गणेश मंदिर हे नागपूरमधील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, अशा फसवणूक प्रकारांपासून भक्तांनी सावध राहावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Advertisement