Published On : Tue, Aug 27th, 2019

श्री नागव्दार स्वामी सामुहीक कढई महाप्रसाद संपन्न

कन्हान : – त्रिमुती श्री नागद्वार स्वामी जोडीवाले सेवा मंडळ नागपुर शाखा कन्हान व्दारे संताजी मंगल कार्यालयात विधिवत पुजा अर्चना सह श्री नागव्दार स्वामी सामुहीक कढई महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

रविवार (दि.२५) ला त्रिमुती श्री नागद्वार स्वामी जोडीवाले सेवा मंडळ नागपुर शाखा कन्हान व्दारे संताजी मंगल कार्यालय कन्हान कांद्री येथे श्री नागव्दार भक्तांनी केळीचे खांब व रंगी बेरंगी फुलानी श्री नागव्दार पहाडीची प्रतिकृति सजावट करून सुशोभित दर्शनी बनविण्यात आली तसेच बर्फाच्या लादीची शंकराच्या पिंडीवर पंचमुखी नागमुर्ती भक्तांचे आकर्षण केंद्र बनले होते. सकाळी ९ वाजता संताच्या व दौलतराव दशरथजी कावळे गरौबा मैदान आदेश नगर नागपुर, श्री माऊली महाराज चांदुरबाजार यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून धार्मिक कार्यक्रमाची विधीवत सुरूवात करण्यात आली.

सायंकाळी ४ वाजता श्री नागद्वार स्वामी ची आरती करून संताच्या भोजनासह परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनाचा व कढई महाप्रसादाचा लाभ घेतला. सायं. ५ वाजता पासुन माऊली भजन मंडळ मनसर व्दारे शिव भोला शंकर व श्री नागव्दार स्वामी च्या भजनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.

सामुहिक कढई आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमास त्रिमुती श्री नागद्वार स्वामी जोडीवाले सेवा मंडळ नागपुर चे व्यवस्थापक श्री दौलतराव दशरथजी कावळे नागपुर, श्री माऊली महाराज चांदुरबाजार, कन्हान शाखेचे श्री.चेतन दयारामजी वैध, श्री. जितु वंसतराव पोटभरे, श्री.पवन रंजीतराव माने, श्री.भगवान हरीभाऊ कावळे, गणपत भाऊ, चंदु खंवले, पप्पु भाऊ ईखार, किशोर येरपुडे, हेंमत वैध, पवन ढोके, हर्षल वैध, प्रफुल सहारे, बादल वानखेडे सह भाविक भक्तांनी सहकार्य केले.