Published On : Tue, Aug 27th, 2019

मातंग समाज संमेलन सम्पन्न

रामटेक : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउदेशिय संस्था रामटेक द्वारा नुकतेच किराड समाज भवन येथे मातंग समाज संमेलन पार पडले. अण्णाभाऊ साठे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त अभिवादन रैली व विचारमंथन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेंद्र मुळक होते.

काँग्रेस नेते किशोर गजभिये , नकुल बरबटे, अशोक बर्वे, उदयसिंग यादव, इसराईल शेख,नरेश बर्वे ,माजी जिल्हा परिषद सदस्य शांता कुंमरे,नगरसेवक दामोधर धोपटे, नकुल बरबटे , उमेश महाजन, अलंकार टेम्भुर्णे, ,वसंत दूंडे, आश्विन सहारे ,मनोहर गजभिये, रविन्द्र शिंदे, जाधव , अशोक हटवार ,बापूराव वस्ताद आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे याचे जीवन ,साहित्य विश्व व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी मातंग समाजातील नागरिक व रामटेक नगरीतील मान्यवर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.