Published On : Sun, Nov 15th, 2020

कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर सोमवारपासून भक्तांसाठी खुले

Koradi Mandir Nagpur

विदर्भातील प्रसिद्ध कोराडी येथील श्री. महालक्ष्मी जगदंबा मंदिर सोमवार, दि. 16 नोव्हेंबर, दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व भक्तांच्या दर्शनासाठी खुले होत आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजता श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पूजा आणि आरती होईल. राज्य सरकारने जारी केलेल्या दिशा निर्देशांचे पालन करीत भक्तांना मातेचे दर्शन घेता येईल.

या शुभ प्रसंगी सर्व वृतपत्र प्रतिनिधी व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे अशी विनंती संस्थानचे सचिव श्री. दत्तू समरीतकर यांनी केले आहे.