Published On : Sun, Nov 15th, 2020

सरकार…मायबाप…तोंडचा घास हिरावू नका!

Advertisement

भारवाहकांचा आंदोलनाचा ईशारा
– रेल्वे प्रशासनात खळबळ

नागपूर: भारवाहकांच्या आयुष्याची गाडी प्रवाशांवर चालते. प्रवाशीच नसतील qकवा त्यांचे ओझेच नसेल तर भारवाहकांची उपजिवीका अडचनीत येईल. प्रवाशांचे ओझे वाहून नेण्यावर भारवाहक जगतात आणि कुटुंबीयांना जगवितात. अलिकडेच रेल्वेने एका कंपनीशी करार करून मोबाइलमधील अ‍ॅपद्वारे प्रवाशांना आपल्या सामानाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली. तशी नोंदणी केली की संबंधित कंपनीचे कर्मचारी प्रवाशाच्या घरी येऊन सामान घेऊन जातील व गाडीत बर्थजवळ चढवून देतील किंवा पार्सल व्हॅनमध्ये ठेवतील. या करारानुसार कुलींच्या हक्कावर गदा आली आहे.

असा आरोप करून सरकार…मायबाप…आमच्या तोंडचा घास हिरावू नका. अशी विनंती रेल्वे प्रशासनाला केली. ओझे वाहून नेण्याचा अधिकार आमचा आहे. आमची जागा कोणी घेत असेल तर कामबंद आंदोलन करू असा ईशार मध्य रेल्वे भारवाहन संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी दिला. रविवारी स्टेशन परिसरात कुलींची मिqटग झाली. यावेळी उपरोक्त निर्णय घेण्यात आला.

प्रवाशांना आवश्यक आणि अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे सतत प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वे नागपूर विभागाने नागपूर रेल्वे स्थानकावर विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. यापैकी काही सुविधा नि शुल्क आहे. प्रवाशांना सोयीचे होत असल्याने आणि रेल्वेला महसूल मिळत असल्याने प्रवासी आनंदी आहेत. प्रवासादरम्यान सामान अर्थात लगेच ही एक मोठी समस्या असते. सामान घरापासून ते स्टेशन आणि स्टेशन ते गाडीपर्यंत व्यवस्थीत घेवून जाने हा मोठा प्रश्न असतो. प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात एका कराराववर स्वाक्षèया झाल्या. करारानुसार संबंधित कंपनीचे कर्मचारी प्रवाशाच्या घरी येऊन सामान घेऊन जातील व गाडीत बर्थजवळ चढवून देतील किंवा पार्सल व्हॅनमध्ये ठेवतील.

या करारासंबधी माहिती मिळताच रविवारी अब्दुल मजीद यांच्या नेतृत्वात नागपूर रेल्वे स्थानकावर कुलींची तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनातर्फे वाणिज्य निरीक्षक सी.आय. आचार्य उपस्थित होते. यावेळी अब्दुल मजीद म्हणाले की, कोरोना काळात कुलींवर उपासमारीची वेळ आली. परंतु रेल्वे प्रशासन आणि रेल्वे संघटनांनी अन्न धान्याची मदत केली. आता हळू हळू जीवनमान सुरळीत झाले. गाड्यांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची वर्दळही आहे. त्यामुळे कुलींच्या हाताला काम मिळते. सध्या रेल्वे स्थानकावर कुलींची संख्या १४३ आहे. मात्र, कोरोनामुळे आज पूर्णक्षमतेने गाड्या चालत नाही. त्यामुळे कुलींची आजही पूर्ण संख्या नाही. त्यातही रेल्वे प्रशासनाने आमच्या हक्कावर गदा आणण्यासाठी योजना आखली.

विशेष म्हणजे आम्हाला या संदर्भात काहीच माहिती देण्यात आली नाही. प्रवाशांच्या ओझ्यावर आमच्या आयुष्याची गाडी चालते. यावर दुसरा कोणी हक्क सांगत असेल qकवा त्या दिशेने प्रयत्न करीत असेल तर आम्ही ते सहण करणार नाही. रेल्वेने आणलेल्या या योजनेचा आम्ही निषेध करतो. रेल्वेने यावर काही पर्यायी उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन करू असा ईशारा अब्दुल मजीद यांनी दिला. बैठकीला असंख्य कुली उपस्थित होते.