Published On : Mon, Aug 26th, 2019

यशवंत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्ट -मी बालगोपालांचा दहीहंडी सोहळा

कन्हान : – ” गोपाला गोपाला रे . . देवकी नंदन गोपाला ! ” च्या गर्जरात यशवंत विद्यालय वराडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा थाटात,
साजरा करण्यात आला.

हा सोहळा मा. देवाजी शेळकी माजी उपसभापती प स पारशिवनी यांच्या अध्यक्षेत व क्रिष्णाजी तेलंगे सदस्य ग्रा पं वराडा, मा मारोती नागमोते, मा कैलास पुंड याच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त इयत्ता ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधिका चे वेशभुषेत सुंदर नुत्य सादर केले आणि बालगोपालांनी तब्बल तीन थर रचित दहीहंडी फोडली. हा उत्साह अद्वितीय होता.

अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सण उत्सवाची माहिती होत असते, असे मनोगत मा. देवाजी शेळकी माजी उपसभापती प स पारशिवनी व्यकत केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळ्या चे महत्त्व सौ अर्चना शिंगणे मँडम हयानी कार्यक्रमाच्या प्रास्तविकातु न स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु रूपाली चिखले हीने तर आभार प्रदर्शन कु अश्विनी खंडार ने केले. प्रसाद म्हणुन दहीकाला व चाकलेटचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापिका के बी निंबाळकर, शिक्षक राजेंद्र गभणे, राकेश गणवीर, सतिश कुथे, मोतीराम रहाटे, दिपक पांडे यांच्या सह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.