Published On : Fri, Nov 2nd, 2018

श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथ तीर्थक्षेत्र मनसर येथे विकास कामांचे भूमिपूजन

आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते यात्री निवास व सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

रामटेक: श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथ तीर्थक्षेत्र, परिसर मनसर येथे नुकतेच रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन)2018-19अंतर्गत मंजूर असलेले यात्री निवास 90(नव्वद )लक्ष रुपये व सिमेंट काँक्रिट रस्ता 12(बारा) लक्ष रुपये या दोन कामांचा समावेश आहे.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यापूर्वीही त्यांचे प्रयत्नाने दिनांक 18 मे 2018 रोजी 2510 ग्राम विकास कार्यक्रम 2017-2018अंतर्गतमंजूर असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्ता 5 ( पाच)लक्ष रुपये चे भूमिपूजन करण्यात आले होते.

यावेळी सरपंच योगेश्वरी चोखान्द्रे चंदनखेडे,जिल्हा परिषद सदस्य कमलाकर मेंघर, पंचायत समिती सदस्य अरुण बन्सोड, ग्राम विकास अधिकारी सुधाकर थुल,सुधाकर मेंघर,जी. एन. निकम,सार्वजनिक बांधकाम विभाग चे अभियंता होळकर ,चक्रधर मंदिर ट्रस्टी पुरुषोत्तम ठाकरे,माजी ग्राम पंचायत सदस्य हेमराज चोखान्द्रे,सर्व ग्राम पंचायत सदस्य बनकर महाराज व कोजागिरी पौर्णिमेला जमलेले भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement