Advertisement
नागपूर: सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात आज मंगळवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी श्री. संत सेवालाल महाराज यांची २८३वी जयंती साजरी करण्यात आली.
नासुप्रचे महाव्यवस्थापक श्री. निशिकांत सुके यांच्याहस्ते श्री. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘नामप्रविप्रा’मध्ये नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. लांडे, नासुप्रचे कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड, कार्यकारी अभियंता श्री. ललित राऊत, आस्थापना अधिकारी तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. योगीराज अवदूत आणि सहाय्यक अभियंता श्री. बांबल तसेच ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे अन्य अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.