मुंबई : आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी म्हटलंय की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, त्यांचा दबाव, एकतर तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. पुढे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या साऱ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका करणारं ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !
संजय राऊत यांनी आरोप करताना म्हटलंय की, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही या सरकारच्या वाटेतून बाजूला व्हा, तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा. जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईप करतील. त्यानुसार दिल्लीत सिद्धता झाली आहे. तुम्ही मदत केली नाही तर तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 15, 2022
पुढे त्यांनी म्हटलंय की, सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहेत. त्यांना सुद्धा टाईप करु, असं सांगण्यात आलं. त्यानंतर ईडीचे लोक पवार कुटुंबियांवर धाडी टाकू लागले. ईडी तर आहेच, त्याचबरोबर केंद्रीय पोलिस बल लावू, त्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्यावर आणि निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडायला लागल्या. मुलुंडचा दलाल (किरीट सोमय्या) सांगतो की आता संजय राऊतांवर धाडी पडत आहेत. तुमचं सरकार आलं नाही, म्हणून याप्रकारे सूड उगवत आहात आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही झुकू? हे शक्य नाही.