Published On : Sat, Aug 31st, 2019

धर्मराज बालकमंदिरात तान्हा पोळा

कन्हान : – धर्मराज बालकमंदिर कांद्री-कन्हान येथे आज तान्हा पोळा साजरा करण्यात आला. नंदिबैलासह सजून धजून आलेल्या चिमुकल्यांचे मुख्याध्यापिका आशा हटवार, बालक मंदिरच्या शिक्षिका कविता साखरकर, सिंधू गिरडकर, चित्रलेखा धानफोले, मंदा ढोले यांनी औक्षवण करुन पूजन केले. याप्रसंगी नंदिबैल सजावट व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत हर्षवर्धन नेवारे, स्वस्तिक काळे, चिराग बारई, युगांत पोटभरे, आरुषी मोटघरे, इशिता इंगोले, अक्षरा इडपाची या विद्यार्थ्यांचा क्रमांक आल्याने त्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करून छोटय़ा बालकांचा तान्हा पोळा धर्मराज बालक मंदीरात थाटात साजरा करण्यात आला.