Published On : Fri, Feb 7th, 2020

अमृता कन्स्ट्रक्शनसह कार्यकारी अभियंता बारहाते, कनिष्ठ अभियंता लामसुंगे यांना कारणे दाखवा नोटीस

– अयोध्या नगर येथील निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरण

नागपूर: अयोध्या नगर येथील रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या डांबरीकरण प्रकरणी संबंधित एजन्सी अमृता कन्स्ट्रक्शनसह हनुमान नगर झोनचे कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, कनिष्ठ अभियंता लामसुंगे यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावले आहे.

अयोध्या नगर येथे प्रतापसिंह चव्हाण यांच्या घरापासून ते श्री. तडस यांच्या घरापर्यंत १२ लाख रुपये निधी खर्च करून ३०० मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात आले. संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित एजन्सी व अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित एजन्सी अमृता कन्स्ट्रक्शन तर्फे सदर रस्त्याचे पूर्ण काम करण्यात यावे. तसेच सदर कामाची ‘थर्ड पार्टी टेस्टिंग’ करून पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही त्यांनी निर्देशित केले.