Published On : Mon, Jun 29th, 2020

सलुन दुकाने सुरु करण्यास दुकानदारांचा नकार

Advertisement

रामटेक – महाराष्ट्र शासनाने सलुन दुकानावरची बंदी उठवून सलुन चालकांना आपली दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी रामटेक शहरातील सलुन व्यावसायिकांनी दुकाने सुरु करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. कारण शासनाने नेमुन दिलेल्या अटीमध्ये फक्त ग्राहकाचे केस कापले जातील व कलर केल्या जाईल एवढेच फक्त नमूद केले आहे.

याव्यतिरिक्त बाकीच्या कामांना शासनाने सरसकट बंदी घातली आहे याचा रोष म्हणून रामटेक शहरातील सर्व सलुन व्यावसायीकांनी शासन जोपर्यंत पुर्ण काम करण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत आपली दुकाने बंद ठेऊ असा सभेमध्ये ठराव घेऊन जणु सरकारला निर्वाणीचा इशाराच दिला.शासनाच्या या जाचक अटीमुळे सलुन व्यावसायिकांप्रती जे धोरण निर्धारित केले आहे या धोरणाचा कडाडून विरोध रामटेक मधील सर्व सलुन दुकानदारांने केला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुकाने सुरु केल्यावर स्वच्छतेच्या कारणावरून येत असलेला खर्च हा सलुन दुकानदाराला न परवडनारा आहे. आणी त्यातच फक्त कटिंग कापायची अट त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला सलुन व्यावसायीक हा अजुन डबघाईस येईल म्हणून हा दुकान सुरु न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

नेहरु मैदान येथे झालेल्या सभेत नाभिक दुकानदार संघ रामटेकचे समस्त पदाधिकारी व मार्गदर्शक यांनी यानिमित्ताने उपस्थित राहून उपस्थित रामटेक शहरातील सर्व सलुन दुकानदारांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थितांमध्ये सर्वश्री वैभव तुरक,सतिश सुरुसे ,उमेश पापडकर,क्रिष्णा कावळे,सुनील खुरगे,रमेश उमरकर, सचिन वलोकर,प्रफुल्ल अनकर, मंगेश वलोकर, दिनेश कावळे,प्रशांत जांभुळकर, रमेश पापडकर, नथ्थुजी चन्ने, अनिल रुद्रकार आदिंनी सभेच्या चर्चेत सहभाग नोंदवला

Advertisement
Advertisement