Published On : Mon, Jun 29th, 2020

कोविड : राज्यात 6 लाख 02 हजार व्यक्ती कॉरंटाईन, 9 कोटी 36 लाखांचा दंड – गृहमंत्री

मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 37 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 6 लाख 02 हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.22 मार्च ते 27 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1.37 097 गुन्हे नोंद झाले असून 27,914 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 9 कोटी 36लाख 19 हजार 861 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 23 हजार 677 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 285 घटना घडल्या. त्यात 860 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.


100 नंबर -1 लाख 4 हजार फोन
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,04,833 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 751 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 6,02086 व्यक्ती Quarantine आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1335 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 85,269 वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 36 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 37, पुणे 3, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस. 1,