Published On : Wed, Mar 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक; नागपूर हिंसाचारादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग;आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर :औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नागपुरात दोन गटात वाद पेटला. यानंतर महाल परिसरात मोठा हिंसाचार घडला. यादरम्यान वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक सारख्या घटना घडल्या. मात्र दुरीकडे हिंसाचारादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. दंगलखोरांनी महिला पोलिसाचा विनयभंग केला असल्याची घटना घडली.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एएनआयने वृत्त प्रकाशित केले.

Gold Rate
Apr 21 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,53,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचार झाला. त्यामुळे नागपुरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी ठिकठिकणी मोठा बंदोबस्त तैनात केला.

हिंसाचारादरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी इतर महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत अश्लील शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे.

हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील काही आरोपींनी चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिला पोलिसासोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले. हिंसाचारातील आरोपींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्पर्श करुन वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिला पोलिसांना जमावातील काही लोकांनी शिवीगाळ देखील केली.

नागपूर हिंसाचाराच्या घटनेत गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेदरम्यान, एका आरोपीने आरसीपी पथकातील कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसला चुकीचा स्पर्श केला. आरोपीने काही महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अश्लील हावभाव केले आणि गैरवर्तन केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement