Advertisement
नागपूर : शहरात अनेक भागात नळाच्या पाण्यातून अळ्या येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दक्षिण नागपुरातील मानेवाडा रिंग रोडवरील महालक्ष्मी नगरात अनेकांच्या घरी नळाच्या पाण्यातून अळ्या (जळू) येत आहे.
याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केल्या. इतकेच नाही तर संजय गांधी नगर वार्ड क्र. १ मध्ये नळाच्या पाण्यात अळ्या आढळून आल्या.
यासंदर्भात नागरिकांनी एकत्रित येत अरविंद बापुराव घोरमारे यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाला निवेदन दिले. तसेच रेशीमबाग गजानन महाराज मंदिर परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही त्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो, अशी तक्रार महापालिकेकडे केली.
Advertisement