Published On : Mon, Jun 10th, 2019

आंनदनगरात दगडफेक नागरिक त्रस्त प्रशासन हैरान

कामठी: नवी कामठी भागातील आंनद नगरात गत ८दिवसां पासून रात्री बेरात्री अज्ञात व्यक्ति कडून दगड फेक करण्यात येत आहे यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून दगडफेक करणाऱ्याचा सुगावा लागत नसल्याने पोलिस प्रशासन सुद्धा हैरान झाले आहे.

आंनद नगर भागात मोलमजूरी करून राहणाऱ्याची मोठी संख्या आहे साधारण आठ दिवसां पूर्वी मध्यरात्री ३-४ घरावर दगड आले नागरिकांनी दुर्लक्ष केले त्या नंतर अनेकांच्या घरावर रात्री बेरात्री दगडफेक होऊ लागली येथील नगरसेविका संध्या रायबोले यांनी पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांना निवेदनाद्वारे कार्यवाही ची मागणी केली 2 पोलिस कर्मचारी रात्री गस्त करतात त्यांच्या सोबत संपूर्ण नागरिक जागते पण दगडफेक करणारे अद्याप सापडले नाही त्यामुळे नागरिकांच्या मनात अनामिक भिति निर्माण झाली आहे
दरम्यान शनिवारी रात्री पोलिस निरीक्षक बापू ढेरे,दुय्यम निरीक्षक पाल यांनी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या उपस्थितित नागरिकांची बैठक आंनद नगरात घेऊन समुपदेशन केले दोन्ही अधिकारी स्टाफ सह रात्री उशिरा पर्यंत होते या दरम्यान सुधा दगडफेक होत होती रविवारी तहसीलदार अरविंद हिंगे यानी भेट देऊन परिस्थितिची पाहणी केली

Advertisement

येथील नागरिकांनी बंद पडलेल्या बाबा रोलिंग मिल परिसरातील काटेरी झुडुपा च्या वनातून दगडफेक होत असल्याने काटेरी झुडुपाचे वन कापण्याची मागणी केली आहे

न प मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी बोलून त्या बाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार हिंगे यांनी उपस्थित नागरिकांना दिले यानुसार या परिसराच्या कडेच्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपे कापण्याचे कामाला आज गती देण्यात आली तर आज सोमवारी डीसीपी हर्ष पोद्दार यांनी आनंद नगर भागाची पाहणी केली व परिस्थिची जाणीव करून घेत या परिसरात तीन फिक्स पॉईंट लावणे, दिवस रात्र पाळीला दोन पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करणे, फ्लड लाईट ची व्यवस्था करणे यासह इतर आवश्यक त्या सुविधा करून आरोपीना लवकरात लवकर पकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे फर्मान दिले.याप्रसंगी नगरसेविका संध्या रायबोले, उज्वल रायबोले, पी आय बापू ढेरे, परिसरातील
सीता पटले, शितल सोनवाने, राधा बंसोड़,विमल बघेल, पंचशिला खरोले,सत्यभामा तांडेकर,अनिता मालाधरे नीलोफर शेख,शबनम परवीन,शमीम बानो,जयवंता मोहबे,प्रियंका अंबादे आदी उपस्थित होते.

– संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement