Published On : Mon, Jun 10th, 2019

बाल संस्कारातून देशाचा इतिहासात संस्कारी व्यक्तिमत्व निर्माण होते …ह प भ प्रकाश महाराज वाघ…..

Advertisement

कामठी: बाल संस्कारातून देश सेवे चे व्रत स्वीकारनाऱ्या बालकात देश सेवा , समाज सेवा ,दीन दुबळ्या ची सेवा, सर्व धर्म समभाव ,विचार आणि जाती धर्म पंथ व्यतिरिक्त माणुसकी हाच खरा धर्म हाच गुरु मंत्र धरून समाजातील प्रत्येक घटकाला सेवा देऊन राष्ट्रहित हेच आपले कर्तव्य समजनारा प्रत्येक व्यक्ती खरा देशभक्त असतो असे प्रतिपादन ह भ प प्रकाश महाराज वाघ यांनी कामठी तालुक्यातील रनाळा गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुदेव सेवा मंडळ तर्फे आयोजित बाल सूसंस्कार शिबिराच्या आयोजनात व्यक्त केले .

2 जून पासून ते 9 जून पर्यंत या बाल सुसंस्कार कार्यक्रमातून वयाच्या 5 ते 15, वयोगटातील मुलामुलींना धार्मिक संस्कार, कराटे प्रशिक्षण ,योगा प्रशिक्षण, संगीत प्रशिक्षण, नृत्य प्रशिक्षण ,वर्तुत्व प्रशिक्षण आदि प्रशिक्षण सहित ग्रामस्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आले समारोप समारंभाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता गावात संविधान व ग्रामगीता पुस्तकाचे गाव भ्रमण पालखी जुनागाव रनाळा येथून निघून संपूर्ण गाव भ्रमण करण्यात आली तत्पश्चात ग्रामवासी महिला भगिनी नी घरासमोर रांगोळी काढून हार फुलाच्या उधळणी ने पालखीचे जंगी स्वागत केले कार्यक्रमाला गुरु कुंज मोझरी चे प्रचारप्रमुख दामोदर पाटील रुपराव वाघ माझी उप स्वअधिकारी गुरु कुंज मोझरी ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर मुंदडा ज्येष्ठ समाजसेवक मोहनदास गाडबैल , जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, गुरुदेव सेवामंडळ नागपूर चे अध्यक्ष एड. अशोक येवले, कामठी पंचायत कामठी समिती सदस्य विमलताई साबळे , रनाळा ग्रा प सरपंच सुवर्णाताई साबळे ,मधुसूदन भुतडा आदींनी उपस्थितना मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे प्रल्हाद दादा परिसे, प्रशिक्षक विजय यादव, नृत्य प्रशिक्षक इंचीलवर ताई आदींनी लहान मुलांवर सुसंस्कार घडविले कार्यक्रमाप्रसंगी रणाळा गावातील यश गणेर, आदित्य चंद्रशेखर यांच्या दहावी परीक्षेत प्राविण्य सुचित नामांकनमुळे त्यांच्या स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रामुख्याने ग्रा प सदस्य अनिता नवले, माजी सरपंच मधुकर मुलमुले, संतोष चलपे, विराग जोशी,अरुण उटवाल, सतीश नवले ,वसंत ढोरे ,राम दुर्वे ,घनश्याम अमृतकर ,तुकाराम नितनवरे ,सतीश चौरे ,गजानंद नवले ,राजू ठाकरे ,लक्ष्मण सिंग बागडी, डूमन गिरी, कवडू अडाऊ, पाठक नाना शेंडे, वीरज लांडे ,सीमा जल्पे ,मिणा गिरी, सुनिता गिरी, वर्षा गिरी ,शोभा ठाकरे समवेत प्रशिक्षित विद्यार्थी पालक वर्ग ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद कामठी च्या माजी नगराध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश ग्राम संरक्षण दलाच्या अध्यक्ष मायाताई चौरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती मायाताई चौरे , तर संचालन ज्येष्ठ पत्रकार लीलाधर दाभे यांनी केले व संपूर्ण सात दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक शीला गजभिये व मंगला चलपे यांनी केले.

– संदीप कांबळे कामठी