| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 19th, 2018

  शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

  पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले.

  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार शरद सोनावणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक आदी यावेळी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवनेरी गडावर आगमन झाल्यावर त्यांनी शिवजन्मोत्सव स्थळी भेट दिली. त्याठिकाणी सजविलेल्या पाळण्यात बाल शिवाजींच्या मूर्तीला पाच सुवासिनींनी जोजवून पाळणा गीत म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शिवछत्रपतींची पालखी घेऊन पालखीतील शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गडावर असणाऱ्या मंदिरातील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने शिवनेरी गडावर मोठी तयारी करण्यात आली होती. यावेळी गडावर साहसी खेळांची प्रात्यक्षिके पार पडली. शिवनेरी गडावर राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींची उपस्थिती होती.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145