Published On : Tue, Jun 16th, 2020

कामठीतील शिवभोजन थाळी ठरतेय गरजू नागरिकांसाठी भुकेचा आधार

Advertisement

शिवभोजन थाळीतून मिळते फक्त पाच रुपयात पोटभर जेवण

कामठी : – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वकांक्षी योजनेतुन सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजना यशस्वी ठरली असून या शिवभोजन थाळीचा कामठी शहरातील दोन अर्जदाराना तहसील प्रशासनाच्या वतीने दिलेल्या मान्यतेतून दिपाणी नावाच्या अर्जदाराने कामठी शहरात 1 जुन पासून या शिवभोजनथाळी चा शुभारंभ केला त्यातच दुसऱ्या अर्जदाराला या शिवभोजन थाळी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी आज पंधरा दिवस लोटून गेले तरी यांना शिवभोजन थाळी सुरू करण्याचा मुहूर्तच मिळालेला नाही त्यातच या कोरोना विषाणूच्या लढाईत सुरू करण्यात आलेले दिपाणी शिवभोजन थाळी हे अनेक बेघर , निराश्रित तसेच गरजू व गरिब नागरिकांची भूक शंमविण्याचे काम ही फक्त 5 रुपयात मिळणारी शिवभोजन थाळी करीत आहे.

कोरोना आपत्ती काळात 10 रुपयात मिळणारी शिवभोजन थाळी 5 रुपयात मिळायला लागली असून ही शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्याची परवानगी तालुका स्तरावर कामठी शहरात बस स्टँड चौकातील दिपाणी व जिजाऊ नामक संस्थेला देण्यात आली असून इतर अर्जदार शिवभोजन थाळी साठी बोटं मोडत आहेत त्यातच दिपानि नामक अर्जदारा कडून परवानगी मिळताच ही शिवभोजन थाळीकेंद्र सुरू केली मात्र जिजाऊ नामक संस्थेने मात्र ही शिवभोजण थाळी केंद्र सुरू करण्यासाठी मुहूर्ताची वाट पाहत आहेत . मोटर स्टँड चौकात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचा गरीब व गरजू नागरिकांना आस्वाद घेता येत आहे .

या शिवभोजन थाळीचा मुख्य उद्देश प्रत्येक गरजू , बेघर आणि निराश्रित नागरिकांना चांगले आणि पोटभर जेवण मिळने हा आहे या उद्देशातुन कामठी तहसील प्रशासनाकडे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यासाठी 8 अर्जदारा मधून दोन संस्थांना शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी एकच सुरू करण्यात आलेली हे शिवभोजन थाळी केंद्र तुन दररोज 90 पेक्षा अधिक गरजू नागरिकांना फक्त पाच रुपयात शिवभोजन थाळीतुन भूक शमवित आहे त तर भूक शमविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची फोटो व नाव तसेच मोबाईल क्रमांक घेऊन स्वतंत्र शिवभोजन ऐप वर त्वरित पाठविण्यात येते त्यानंतरच ही शिवभोजन थाळी देण्यात येत आहे.या शिवभोजन थाळीतून भात, पोळी, तसेच दाळ व भाजी देण्यात येत असून या शिवथाळी भोजन मधून पोटभर मिळत असलेल्या जेवणातून गरजू नागरिकांच्या पोटाचा एक आधार बनली आहे.

बॉक्स:-तहसीलदार अरविंद हिंगे-पुरवठा विभागाला याचा लेखाजोखा करता यावा यासाठी स्वतंत्र शिवभोजन एप सुरू करण्यात आली आहे या एप द्वारे लाभार्थ्यांचे नाव, फोटो काढण्यात येते त्यामुळे दिवसाला किती थाळीचे वितरण झाले हे समजण्यास मदत होते या एप मध्ये भोजनाचा दैनंदिन प्रकार टाकण्यात येतो तसेच भोजनाची गुणवत्तेसंदर्भात लाभार्थी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवू शकतात