Published On : Mon, Sep 23rd, 2019

शिवणकर झोपडपट्टीवासियांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे : आमदार कृष्णा खोपडे

नागपूर : प्रभाग क्र २६ येथील खाजगी जागेवरील झोपडपट्टीधारकांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळतील, असे आश्वासन आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले.

मनपा विधी समितीचे सभापती तथा नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या वतीने आयोजित पट्टे वाटप पूर्व प्लेन टेबल सर्व्हेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

Advertisement

ह्याप्रसंगी नगरसेवक धर्मपाल मेश्राम, बंटी उर्फ जितेंद्र कुकडे, सुनील कोठे, राजेंद्र चकोले, प्रदीप निनावे, ज्ञानदेव गजभिये, हुसेन भाई, आशिक अंसारी, नझीमभाई, अनिल दास, बेबीनंदा गाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

पुढे बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, झोपडपट्टी खाजगी जागेवरील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी पुढाकार घेवून काढलेल्या परिपत्रकामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

१९९० पासून वसलेल्या ह्या झोपडपट्टीवासियांना न्याय दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नगरसेवक धर्मपाल मेश्राम ह्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे संचालन शिवशंकर दास ह्यांनी केले. आभार रमेश दोनाडकर ह्यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement