Published On : Mon, Sep 23rd, 2019

कामठी तालुक्यात हिन्दी दीवस पखवाडा

कामठी :-कामठी तालुक्यातील गादा या गावा मध्ये भारत सरकारचा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र नागपूर व विद्यार्थी नवयुवक बहुउद्देशिय मंडळ गादा तर्फे आयाेजित हिन्दी दिवस पखवाडा निमित्त नेहरू युवा केन्द्रा चे राष्ट्रिय युवा कोर प्रथमेश खुरपडी यांचा नेतृत्वात वाद विवाद प्रतियाेगीता घेण्यात आली

या प्रतियोगितेचे मुख्य उद्देश म्हणजे युवकांमध्ये असलेल्या भाषण कलेला प्रोत्साहन व तसेच राष्ट्रभाषेला महत्व देणे होता.या मधे प्रथम विजेता अविनाश भोयर तर द्वितीय विजेता स्वप्निल मेश्राम ठरले, यांना पारीतोषिक व प्रमांणपत्र देऊन संमानित करणयात आले.

या प्रतियोगितेचे सुत्र संचालन प्रथमेश खुरपडी यांनी केले तर आभार अक्षय चौधरी यांनी मानले.

प्रतीयोगीतेचा यशस्वीतेकरिता मुकेश वाघमारे,अनिकेत खुरपडी,धीरज चिपडे,कमलाकर खुरपडी,पंकज दवंडे,सदानंद शेंन्डे व राकेश जेवडे आदींनी सहभाग घेतले.

संदीप कांबळे कामठी