नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरच्या अध्यक्षा शिवाणी दाणी यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत भाजपाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही कार्यशाळा २७ ते ३० मार्च नेपाळ येथे आयोजित केली आहे. या कार्यशाळेत अनेक देशांचे युवा नेते सहभागी होतील. या अगोदार अशाच तऱ्हेचीं कार्यशाळा ५ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान कंबोडिया व २३ ते २७ ऑगस्ट मलेशिया या देशात क्वालालंपूर येथे झाली होती. ही कार्यशाळा कोनराड अडेनॉर स्कूल फॉर यंग पॉलिटिशियनतर्फे घेण्यात येत आहे.
हा संपुर्ण अभ्यासक्रम चए टप्प्यामध्ये घेण्यात येईल. यानंतर ही कार्यशाळा सिंगापूर, फिलिपिन्स व जर्मनीमध्ये होण्यात येईल. या कार्यशाळेत आशिया खंडातील अनेक देशांचे आणि अनेक पक्षांचे युवा नेते सहभागी होणार आहे. हे युवा नेते आशिया खंडातले राजकारण, समाजव्यवस्था, सामाजिक शास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनेक पैलूंचा अभ्यास करतील. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शिवाणी दाणी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.