Published On : Sat, Mar 14th, 2020

शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून वृध्द-आश्रम मनसर येथे अल्प-आहार

रामटेक : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामटेक तर्फे भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या भव्य दिव्य रॅली मध्ये आमचे मुख्य मार्गदर्शक माननीय श्री. हेमंतभाऊ गडकरी (मनसे,सरचिटणीस) उपस्थित होते, तसेच नागपुर जिल्हाचे प्रमुख पदाधिकारी श्याम पुराणी व आदित्य दुरूरकर हे उपस्थित होते.

तसेच नागपुर जिल्हा सचिव मनोजभाऊ गुप्ता, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक रामटेक मनसे तालुका अध्यक्ष शेखरभाऊ दुन्डे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला व वृध्द-आश्रम मनसर येथे अल्प-आहार यामध्ये आलुभात व मिठाई देण्यात आले अशाप्रकारे रामटेक विधानसभा क्षेत्रात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळेला रामटेक तालुका उपाध्यक्ष देवाजी महाजन, रामटेक तालुका उपाध्यक्ष मनोजजी पालीवार, पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशनभाऊ फुलझले, पारशिवनी तालुका उपाध्यक्ष नरेन्द्र पांडे, मनसे सैनिक जितुभाऊ वलोकर, रमेश उईके, विशाल लोणकर, विक्की नांदुरकर, मनोहर मरस्कोल्हे, अनिल दुन्डे, दादु महाजन, शुभम दिवटे, अश्विन दुन्डे, दर्श दुन्डे, हर्ष दुन्डे, तसेच महिला पदधिकारी महाजन बाई, अर्चनाताई मेश्राम, शिवकन्याताई दुन्डे, रंजनाताई गजभिये, रंजिताताई दुन्डे, निलिमाताई दुन्डे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य कार्यक्रमाला उपस्थित होते.