Published On : Sat, Mar 14th, 2020

विद्यार्थ्यांनो अभ्यासाची कास धरा व यश मिळवा-सरपंच परमानंद शेडे

Advertisement

कांद्री शाळेत निरोप समारंभ
विद्यार्थ्यांनी सादर केले रंगारंग कार्यक्रम निरोप समारंभात विद्यार्थ्यानी व्यक्त केली कृतज्ञतेची भावना

रामटेक:-वार्षिक सरस्वती पूजन व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा संयुक्त कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा कांद्री येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी सरपंच परमानंद शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समिती अध्यक्ष श्रावण ताकोद,सामाजिक कार्यकर्ते नागसेन भरणे तसेच प्रकाश विद्यालयाचे शिक्षक मिलिंद वानखेडे यांची उपस्थिती लाभली.पेराल तेच उगवेल या करिता आपण चांगले कर्म करीत रहावे व यश मिळवावे असा संवाद सरपंच परमानंद शेंडे यांनी तर विद्यार्थ्यांनी सदैव अभ्यासाच ध्यास धरावा व प्राथमिक शाळा व शिक्षक यांना कधीही विसरु नये असे भावनिक आवाहन केले. तसेच शाळेला पुस्तकांची भेट दिली.

शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक केले,मोनिका धुर्वै,प्रिया बर्वे,तेजस इडपाची वैभवी सोनटक्के या विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकांबद्धल मनोगत व्यक्त केले. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यांत आल्या.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य,गायन अंताक्षरी कथाकथन असा रंगारंग कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे संचालन ज्योती जांभुळकर तर शिक्षक राहूल मानेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. रोहन लांजेवार, प्रियांशू चंदनबटवे,पूजा ताकोद यांसह सुजाता नागदेवे,संगीता मेश्राम व ममता भैसाळे यांनी सहकार्य केले.