– पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन दिला पाठिंबा
मुंबई: शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयो मधून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर शिवसेनेला पाठिंबा दिला.
सर्वसामान्य नागरिकांच्या , आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या , मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्याने शिवसेनेला पाठिंबा दिला.
प्रहारचे संस्थापक आमदार बचू कडू, ( अचलपूर ) आणि आमदार राजकुमार पटेल ( मेळघाट ) यांनी पाठिंब्याचे पत्र दिले,प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकतीने शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची बचू कडू यांची ग्वाही दिली.
