Advertisement
नागपूर : रामटेक मतदारसंघात शिवसेना गटाचे उमेदवार आशिष जयस्वाल बहुमताने निवडून आले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना पराभूत केले.मतदारसंघात महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या (ठाकरे गट) विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आघाडीचा घटक असूनही काँग्रेस पक्षातील नेते काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहे.
काँग्रेसची ही भूमिका संशयास्पद असून त्यांना छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांनी केला होता. मुळक यांना सुनील केदार यांचे पाठबळ होते. मात्र बंडखोरी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र मुळक यांना यश आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आशिष जयस्वाल यांनी रामटेकच्या गढ राखला आहे.