
नागपूर : ‘आपली बस’ सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नसल्याच्या आरोपावरून शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आंदोलन केले. शिवसेना नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांना तातडीने थकीत व नियमानुसार वेतन देण्याची मागणी केली. ‘आपली बस’ सेवेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
नितीन तिवारी यांनी सांगितले की, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ‘आपली बस’ कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांनाच नियमित वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दुर्दैवी आहे. मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनामुळे काही काळ मनपा मुख्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews
गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news
25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...
त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...
बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha
किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...




