Published On : Mon, May 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांचे ‘ऑपरेशन यू-टर्न’ सुरू;आता ड्रग्ज घेऊन वाहन चालवले तर थेट जेल!

Advertisement

नागपूर : उपराजधानीतील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता नशेत वाहन चालवणाऱ्यांविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत पोलिसांनी प्रथमच अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग किटचा वापर करत विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईमुळे शहरातील नशा करून वाहन चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हॉटेल प्राईड चौकात विशेष नाकाबंदी
‘झिरो फेटॅलिटी’ म्हणजेच रस्ते अपघातांतील मृत्यूदर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून नागपूर पोलिसांच्या मादक पदार्थ दस्त्या क्रमांक-२ ने हॉटेल प्राईड चौक परिसरात विशेष नाकाबंदी केली. यावेळी केवळ मद्यपानच नव्हे, तर ड्रग्ज सेवन करून वाहन चालवणाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासाठी पोलिसांनी आधुनिक ‘ड्रग टेस्टिंग किट’चा वापर केला. नागपूरमध्ये रस्त्यावर थेट मशीनद्वारे ड्रग्ज तपासणीची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.

मशीनने उघड केला गांजाच्या नशेचा पर्दाफाश
नाकाबंदी दरम्यान एका वाहनचालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची लाळ (Saliva) तपासणी केली. अत्याधुनिक मशीनद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत चालकाचा THC (टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल) अहवाल पॉझिटिव्ह आला.तपासात संबंधित चालकाने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.

Advertisement

सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी चालकाविरोधात सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नशेच्या अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांविरोधातील ही मोहीम आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नशेत वाहन चालवणे हे केवळ चालकासाठीच नव्हे तर रस्त्यावरच्या निरपराध नागरिकांसाठीही जीवघेणे ठरते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत शहरातील विविध भागांत अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा पुढील काही दिवसांत राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate  #nagpurnews

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha #news

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges