Published On : Fri, Mar 22nd, 2019

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे

शिवसेनेची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली या पत्रकार परिषदेत पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

शिवसेनेची पहिली यादी-
लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी
1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
4) ठाणे- राजन विचारे
5) कल्याण- श्रीकांत शिंदे
6) कोल्हापूर- संजय मंडलिक
7) हातकणंगले- धैर्यशील माने
8) नाशिक- हेमंत गोडसे
9) शिर्डी- सदाशिव लोखंडे
10) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
11)संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
12)बुलढाणा- प्रतापराव जाधव
13)रामटेक- कृपाल तुमाणे
14)अमरावती- आनंदराव अडसूळ
15)परभणी- संजय जाधव
16)मावळ- श्रीरंग बारणे
17)धाराशिव – ओमराजे निंबाळकर
18)हिंगोली – हेमंत पाटील
19)यवतमाळ – भावना गवळी
20) रायगढ़ – अनंत गीते
21) सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत

ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली आहे. आता लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.