Published On : Thu, Apr 29th, 2021

शहरासह ग्रामीण भागात ऐकून ११० नव्या कोरोना रूग्णांची भर

ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत होत आहे झपाट्याने वाढ

रामटेक – कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच आहे. दिवसेंदिवस सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत असून मृत्यूचा आकडाही वाढत आहे.

रामटेक शहरात ३७ तर ग्रामीण भागात ७२ अश्या ११० नव्या कोरोना रूग्णांची भर झाली आहे तर तालुक्याचा आतापर्यंत चा आकडा ५ हजार ६५७ च्या वर पोहोचला असून ३३६६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर मृत्कांची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे.

ग्रामीण व शहर मिळून रुग्णांची माहिती प्राप्त झाली त्यामुळे ऐकून पेशंट ची संख्या वाढली असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.