Published On : Fri, Mar 8th, 2019

शीतल तेली-उगले: पुरुषांपेक्षा दुप्पट कार्य करतात महिला नामप्रविप्रा आणि नासुप्र’च्या महिला अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास येथे महिला दिनानिमीत्य आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी उपस्थित महिला अधिकारी/कमर्चाऱ्यांना मार्गदर्शन केले. घर आणि कार्यालय अश्या दोन्ही ठिकाणी आज महिला यशस्वीपणे आपली जवाबदारी पार पाडत आहे.

प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. कार्यक्षेत्रात महिलांनी नेहमीच अग्रेसर राहून कार्य करायला हवे. महिलांच्या कार्यमुळे नेहमीच समाजाला फायदा झाला असून समाजकार्यात नेहमीच महिलांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे.

भविष्यात महिला दिवस साजरा करण्याची गरजच पडू नये असा समाज निर्माण करण्यास महिलांची भूमिका असायला पाहिजे. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सुप्रिया जाधव, जनसंपर्क अधिकारी व सचिव-१ श्रीमती कल्पना गीते आणि सहाय्यक विधी अधिकारी प्रियंका इरखेडे तसेच इतर महिला अधिकारी/कमर्चारी यावेळी उपस्थित होते.