Published On : Mon, May 21st, 2018

माधुरी दीक्षित नाही…महापौर आहेत

गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आढाव्यासाठी भाजपा पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे नगरसेवकांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक प्रभागात फिरत नाहीत, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नाही, अशा तक्रारी गडकरींपर्यंत जात आहेत.

गडकरी यांनी बैठकीत फटकेबाजी करीत सर्वांना लोटपोट केले. गडकरी म्हणाले, शहरातील विविध चौकात छोट्या एलईडी स्क्रीन लागल्या आहेत. एक दिवशी मी व पत्नी कांचनसह गाडीने जात असताना स्क्रीनवर पाहिले व या माधुरी दीक्षित आहेत का, असे विचारले. यावर कांचन हसून म्हणाली, अहो या माधुरी दीक्षित नाहीत, तुमच्या महापौर आहेत. हे ऐकून आम्ही सारेच हसलो, असे सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ उडााला. उपस्थित महापौरही लाजल्या. या फटकेबाजीनंतर संबंधित स्क्रीनवर माणसं ओळखू आली पाहिजेत, असे सांगत तिचा आकार वाढविण्याची सूचना गडकरींनी केली.