Published On : Mon, May 21st, 2018

इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

वसई : पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त मुख्यमंत्र्यांची नालासोपाऱ्यात सभा झाली . यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूर यांच्या स्थानिक राजकारणावर ताशेरे ओढले . स्थानिक परिसरात जनतेवर दादागिरी दाखविणाऱ्यांना आम्ही भीत नाही असे ते म्हणाले .

मी सभेसाठी वसई-नालासोपाऱ्याला निघालो असता हा इलाका ठाकुरांचे असल्याचे सांगण्यात आले. मी सांगितलं, अरे इलाका तर कुत्र्या-मांजरीचा असतो, आम्ही तर वाघ आहे. वाघ जंगलाचा राजा असतो. त्याच्यासाठी कोणताच इलाका नसतो, पूर्ण जंगलच त्याचा इलाका असतो. वाघ जिथे जाईल तो भाग त्याचा होतो”.

यावेळी मुख्यंत्र्यांनी ठाकूरांच्या दादगिरीचा समाचार घेतला. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत.

“आमची शिट्टी नाही वाजली तर तुमची शिट्टी वाजेल, तुमचं पाणी बंद करु, तुम्हाला बघून घेवू अशी धमकी दिली जात आहे. मात्र घाबरुन जायचं कारण नाही, मी तुमच्या पाठीशी आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेवरही निशाना साधला .