Published On : Tue, Apr 30th, 2024

नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर,म्हणाले…

Advertisement

मुंबई: पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. मोदींच्या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर दिले. जुन्नरमधील एका सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान मोदींचे म्हणणं खरं आहे. आत्मा अतृप्त आहे, पण ती स्वत:च्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे दुखणं बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई वाढली आहे, लोकांना संसार करणं कठीण झालं आहे, त्यासाठी अस्वस्थ आहे. अडचणीत असणाऱ्या लोकांचे दुख: मांडणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे माझं कर्तव्य आहे, माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे”,असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून सोडवण्यासाठी करायचा असतो, मात्र, आताचे सत्ताधारी या सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी करत आहेत, असा घणाघातही पवारांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत उत्तम काम केलं. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध केला, म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर हुकूमशाही सुरू आहे,असेही पवार म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती,अशी टीका मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.