Published On : Tue, Apr 30th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सातारा मतदासंघात उदयनराजेंच्या विजयाचा भगवा फडकणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

कराड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्पसभेत पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी साताऱ्यात पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल,असा ठाम विश्वास व्यक्त केला.

शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले हे भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठी भाषेतून केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीमहाराज, छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांचा जयघोष करीत कृष्णाकाठच्या जनतेला माझा नमस्कार असे मोदी म्हणाले.

दरम्यान या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजपचे महामंत्री विक्रांत पाटील, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम, प्रा. मच्छिंद्र सकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement
Advertisement