Published On : Thu, Jun 4th, 2020

शरद पवारांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व मदतकार्याचा घेतला आढावा

मुंबई – ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व मदतकार्याचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज घेतला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे आदी उपस्थित होते.

पक्षाच्या या नेत्यांशी व मंत्र्यांशी शरद पवार यांनी विस्ताराने चर्चा केली व एकंदरीत संपूर्ण माहिती घेतली.

दरम्यान काल (गुरुवारी) ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला प्रशासनासोबत उभे राहण्याचे आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले होते.