Published On : Sat, May 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वर्दीला काळिमा; नागपुरात मद्यधुंद पोलिस हवालदाराकडून पत्नीचा छळ, तात्काळ निलंबनाची मागणी

Advertisement

नागपूर – कायद्याचे रक्षण करणारी वर्दी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दारूच्या नशेत पत्नीवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिस हवालदाराविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नितेश वहिले असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, या प्रकरणानंतर नागरिकांकडून त्याच्या तात्काळ निलंबनाची आणि कठोर विभागीय कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये विवाह झाल्यानंतर आरोपी हवालदार पत्नीला सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत होता. दारूच्या नशेत तो पत्नीला मारहाण करत असल्याचा आरोप आहे. तसेच जातिवाचक शिवीगाळ करून तिचा अपमान करत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेच्या नातेवाईकांशीदेखील आरोपी गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुसऱ्या महिलेबाबत संशय, घरात वारंवार वाद
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोपीचे दुसऱ्या महिलेशी कथित संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. आरोपी पत्नीवर संशय घेत किरकोळ कारणांवरून भांडण काढून मारहाण करत असल्याचेही तिने म्हटले आहे.

१७ एप्रिल रोजी पीडिता नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी भरतवाडा येथे गेली होती. रात्री उशीर झाल्याने ती आईच्या घरी थांबली. दुसऱ्या दिवशी याच कारणावरून आरोपी संतापला आणि पत्नीला मारहाण करत घराबाहेर काढण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

सामान्य माणूस असता तर आतापर्यंत कारवाई झाली असती-
घटना उघडकीस आल्यानंतर शहरात संतापाची लाट पसरली आहे. पोलिस विभागातील कर्मचारीच महिलांवर अत्याचार करत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी हवालदार नितेश वहिले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.