Published On : Sat, May 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महल दंगल प्रकरण:आरोपी मोहम्मद गाजी इफ्तेखारला अटींसह जामीन

आठवड्यातून दोनदा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे न्यायालयाचे निर्देश
Advertisement

नागपूर – महल परिसरात घडलेल्या गाजलेल्या दंगा प्रकरणातील आरोपी मोहम्मद गाजी इफ्तेखार याला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. बोरलेपवार यांनी सुनावणीदरम्यान हा आदेश दिला.

या प्रकरणात आरोपीवर दंगलीदरम्यान तत्कालीन पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. गणेशपेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध दंगल घडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच पोलिसांवर हल्ला करणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, दंगलीच्या वेळी आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करून तत्कालीन डीसीपी निकेतन कदम यांना जखमी केले होते. सरकारी पक्षानेही ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दीड लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलकीवर जामीन मंजूर केला. मात्र, जामीन देताना न्यायालयाने काही कठोर अटी घातल्या असून आरोपीने दर सोमवार व गुरुवारी गणेशपेठ पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक राहणार आहे. तसेच साक्षीदारांवर दबाव टाकणे किंवा तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.