Published On : Sat, May 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर टोकियो बार प्रकरण:आरोपीला 12 मेपर्यंत पीसीआर,मस्करीत फेकलेला चाकू ठरला जीवघेणा

Advertisement

नागपूर : धरमपेठ येथील चर्चित टोकियो बारमध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला 12 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारमधील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या हशा-मस्करीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. मजाक करताना फेकलेला चाकू थेट कॅशियरच्या गळ्याखाली जाऊन लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मृतकाची ओळख अवधेश कुमार (वय 26, रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) अशी झाली असून, या प्रकरणात पोलिसांनी आयुष नेगी (वय 24, रा. उत्तराखंड) याला अटक केली आहे. आयुष हा टोकियो बारमध्ये बार टेंडर म्हणून कार्यरत होता.

अवधेश कुमार हा चार महिन्यांपूर्वीच टोकियो बारमध्ये नोकरीला लागला होता. गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे बारमधील कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक हादरले आहेत.

Advertisement

सीताबर्डी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, प्राथमिक तपासात ही घटना निष्काळजीपणा आणि मस्करीदरम्यान घडलेला अपघात असल्याचे समोर येत आहे. मात्र, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.