Published On : Sun, Sep 3rd, 2017

वाडी शहर कॉग्रेस अध्यक्षपदी शैलेश थोराणे तर उपाध्यक्षपदी प्रशांत कोरपे ची निवड

Advertisement

वाडी(अंबाझरी): नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसला मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्हाध्यक्ष राजेन्द्र मुळक यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्या अनुसंगाने नुकतीच वाडी शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली . यावेळी कॉग्रेसचे युवा नेते शैलेश थोराणे पाटील यांची वाडी शहर कॉंग्रेस अध्यपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष सामाजीक कार्यकर्ते प्रशांत कोरपे यांना जबाबदारी देण्यात आली.

या संदर्भात नुकतेच पक्ष कार्यालयाच्या बैठकीत काँग्रेसचे तालूका अध्यक्ष प्रकाश कोकाटे, माजी ग्रा. प. सदस्य दुयोधन ढोणे, माजी सरपंच भिमराव लोखंडे, बेबीताई ढबाले, माजी सभापती प्रमिला पवार, नगरसेवक राजेश थोराणे, आनिल पाटील, पुरुषोत्तम लिचडे, ज्ञानेश्वर गांवडे,य़वक काँग्रेसचे आश्विन बैस आदींनी त्यांचे पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी नवनिर्वाचीत वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराणे यांनी वाडी शहरातील कॉंग्रेस पक्षाला बुध लेवल पासून संघटन बांधणी करण्यासह वर्तमान सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात जनजागृती करण्याचे सुतोवाच केले. सोबतच सर्व समाजातील घटकांना सामावून घेण्याची ही ग्वाही दिली. त्यांच्या निवडणीने मागासवर्गीय समाज, विद्यार्थी, महिलांचे प्रश्न, सरकारी योजना, इत्यादिंना न्याय मिळण्यास मदत होईल.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अशी अपेक्षा याप्रसंगी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली , या नियुक्ती समारंभाप्रसंगी कॉंग्रेसचे गौतम तिरपूडे, भिमराव कांबळे ,किशोर नागपूरकर ,अशोक गडलिंगे, विनोद पोहणकर, योगेश कुमकुमवार, नामदेव चवरे, गणपत बिडवाईक, मंगेश भारती, गोरकनाथ भांगे, प्रमोद गिरेपूंजे, नितीन कोहपरे, सचिन तिजारे, प्रकाश गोमकर , शरद शिंपीकर, दिलीप गोडेकर,तल्हार ताई, राजेंन्द्र कळंबे, किशोर कावडकर इ. कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्ती नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .

Advertisement
Advertisement