Published On : Mon, Jul 27th, 2020

रामटेक येथील बाबूजी पॅलेसमध्ये शाहिरांनी दिली गुरूला मानवंदना

Advertisement

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा उपक्रम।

रामटेक: डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,रामटेक द्वारा गुरू शिष्य परंपरा कार्यक्रमाचे आयोजन बाबूजी पॅलेस हाऊस येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आले होते. कोविड 19 प्रादुर्भावाची जाणीव ठेवून योग्य ते अंतर ठेवून कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन दीप प्रजवलन करून शाहीर रामरावजी वडाँद्रे यांचे हस्ते करून संस्थेचे सचिव शाहीर अलंकार टेम्भुरने यांनी प्रास्ताविक केले.

प्रस्ताविकातून त्यांनी गुरू शिष्य परंपरेचं महत्व सांगून कला आत्मसात करूनप्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य आणि प्रतिभावंत गुरुची आवश्यकता असते. तसेच नवीन पिढीत शाहिरी कलेची आवड निर्माण व्हावी व ती या पिढीने अंगिकारावी यासाठी संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे.

यावेळी शाहीर नामदेव जांभुळकर ,वसंता दुनडे, लीलाधर वडाँद्रे,अंकुश सहारे,कन्हय्या इंगळे,वसंता सहारे,दर्शन मेश्राम, भारती जांभूळकर ,वसुंधरा नंदेश्वर,विश्रांती भैसारे तसेच बालकलाकार रोजस टेम्भुरने, प्रज्वल भैसारे,आकाश नंदेश्वर,यश टेम्भुरने,आभास नंदेश्वर यांनी आपली कला सादर केली.यावेळी सर्व शाहिरांचा संस्थेच्या वतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आभार अजयकुमार टेम्भुरने यांनी मानले.