भूमिपूजनचा फलक लावण्यापलीकङे अजून काहीही झालेले नसल्याने परिसरातील नागरिकात तीव्र संताप
रामटेक : शेती उत्तम वाटत असेल तर तेथेत पर्यत पोहचण्याचा मार्ग चांगला असवा लागतो. हीच बाब लक्षात घेतात मागेल त्याला पाधन रस्ता ही योजना सरकारने अमलात आणली होती. त्याच अनुषंगाने काचुरवाही – किरणापूर पांधण रस्त्याचे काही महीन्यापूर्वी मोठया थाटात भूमिपूजन करण्यात आले. परंतु भूमिपूजनचा फलक लावण्यापलीकङे अजून काहीही झालेले नसल्याने परिसरातील नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशी माहिती काचुरवाहीचे सरपंच शैलेश राऊत , यांनी दिली
सदर रस्त्याची दुर्दशा झालेली असल्याने भागातील शाळकरी विद्यार्थीना व शेतकरीवर्गाला अजून किती दिवस यातना सोसाव्या लागणार आहे ?
असा सवाल गावकरी विचारात आहेत.मुख्यंमंत्री ग्राम सङक योजने १९~२० अंतर्गत हा रस्ता मंजूर झाला . १८ ऑगस्ट २०१९ रोजी मोठ्या धुमधडाक्यात रस्ता बांधकामाचे भूमिपूजन झाले होते .
परंतु अनेक महिने उलटून या रस्त्याच्या बांधकामात एक दगडही पडलेला नाही त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न ग्रामस्थांच्या आहे अतिशय महत्त्वाच्या असलेला हा रस्ता परिसरातील किरणापूर सह आदी गावांना जोडला जातो सदर मार्गावर किरणापूर, काचुरवाही, चोखाङा, वडेगाव ,येथील शेतकऱ्यांच्या शेती आहे. त्यामुळे या रस्त्याने बैलगाडी, ट्रॅक्टर , शेती उपयोगी साहित्य नेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते .
विशिष्ट म्हणजे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे पावसाळ्यात पाण्याचा अंदाज येत नसल्याने सायकल स्वार किंवा शाळकरी विद्यार्थ्यांना डोंगरावर खोल खड्ड्यातून वाट काढावी लागते त्यामुळे तयारी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अनेकदा गणवेश चिखलाने खराब झाल्याचे दिसून आले अशा परिस्थितीत “आम्ही शाळेत कसे जायचे तुम्हीच सांगा” असे शब्द मुलांन कङून उच्चारले जात आहेत.
तसेच दु चाकी स्वरांचे अपघात होतात रस्त्याच्या दैना अवस्थेमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत जाणे ही कठीण होते. अशी माहिती काचुरवाहीचे सरपंच शैलेश राऊत यांनी दिली.भूमिपूजन झाल्या नंतर सदर रस्त्याचे काम ज्या कंत्राट ज्याला मिळाले त्याने दोन किमी पर्यंत नाली खोदकाम काम केले. सिमेंट पाईप तेथे आणूनही ठेवले आहेत. पण तेथेही काम पुढे सुकलेले नाही
काही शेतकऱ्यांनी नाली टाकण्यावर काम थांबवले आहे कि काचुरवाही – किरणापूर गावापर्यत गावकरी व शेतकरी हे रस्त्याचा बाजूला त्यांची जागा आहे असे सांगतात त्यामुळे त्या भागात रस्त्याचे काम थांबविले आहे. आता हाही मुद्दा विकास कामत अडथळा निर्माण करणारा ठरला आहे. आता संबंधित खरोखरच अतिक्रमण केले किवा नाही केले. यावरही तोडगा काढता येतो.
याकरिता भूमिअभिलेख कार्यालयचा सहकार्याने तत्काळ शासकीय मोजणी करून योग्य तो मार्ग काढवा या संदर्भात उपअधीक्षक
भुमिअभिलेख रामटेक , उपविभागीय अधिकारी, रामटेक तहसिलदार रामटेक, सर्वाना रस्त्याच्या मोजणी संदर्भात रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशीष जयस्वाल तसेच गट ग्रामपंचायत काचुरवाही कडून प्रस्ताव पाठविण्यात आला .
मात्र प्रस्ताव धुळखात असून अजून पर्यंत काचुरवाही – किरनापुर रस्त्याच्या मोजणीच्या प्रश्न मार्गी लागलेला नाही तरी पण रस्त्याची मोजणी करून झालेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी काचुरवाहीचे सरपंच शैलेश राऊत , किरणापूरचा सरपंचा मिनाक्षी वाघधरे , गजानन भलमे, चंदू बावनकुळे, सुरेश कुथे, रोशन ढोबळे, दशरथ वैरागडे, विश्वनाथ नाटकर, अनिकेत गोल्हर, काशिनाथ नाटकर, प्रमोद गोल्हर, विनोद देशमुख , हरिदास धुर्वे , कैलास मोहनकार , देवराव धुर्वे , जगदीश हिवसे, गुलाब सोमनाथे , प्रभाकर नाटकर , गोपीचंद भिलकर, यासह आदी शेतकऱ्यांनी केली.










