Published On : Wed, Oct 30th, 2019

कामठी शहरात फोफावला देहव्यवसाय

Advertisement

कामठी:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या काही परिसरात गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देह व्यवसाय अड्यावर धाड घालीत पर्दाफाश करीत कित्येक देहव्यवसाय उघडकीस आनन्यात सामाजिक सुरक्षा पथक तसेच पोलीस विभागाला यश प्राप्त झाले असले तरी नागपूर पासून एकदम हाकेच्या अंतरावर असलेल्या व नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरातील काही परवाना धारक लॉज, कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी गावाच्या कडेला, गुमथळा मार्गावर तसेच अनधिकृत असलेल्या पॉश बिल्डिंग मध्ये विश्रांती थांबा च्या नावावर गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देहव्यवसायाला उधाण आले असून स्थानिक पोलिसांच्या अभयपणामुळे हे देहव्यावसाय चांगलेच फावले आहे.

बदलत्या काळानुसार संस्कृती लोप पावत असून शहरात व्यभिचाराला वाव मिळत आहे दिवसागणिक वाढलेल्या गरजा बघता आर्थिक टंचाई तसेच झटपट श्रीमंतीच्या हव्यासया पोटी काही गरजवंत तर काही हौशी युवती महिला देह व्यवसायाचा आसरा घेत आहेत मात्र पोलीस विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र सध्या कामठी शहरात पहावयास मिळत आहे.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहराच्या 20 ते 25 की मी परिसर अंतरावरील गावातील काही तरुणी व महिला कामठी येथे येऊन आपले देहजाळ शहरात पसरवीत आहेत या व्यवसायातील अनेक दलाल सक्रिय होऊन कॉलेज तरुणींना आपल्या मोहजाळ्यात अडकवून छुप्या देह व्यवसायात अडकवीत आहेत . नुकतेच डीसीपी स्कॉड ने रमानगर येथे गेल्या कित्येक महिन्यापासून गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्य घरी धाड घालून देह व्यवसाय उघडकीस आणला तसेच मागिल वर्षी कुंभारे कॉलोनी, यशोधरानगर, कामठी नागपूर रोड वरील लॉज , आदी ठीकानी पोलिसांनी धाडी घातलेल्या आहेत त्यानंतर मात्र पोलीस विभागाने दूतराष्ट्र रूप धारण करून वेश्याव्यवसायावर लगाम घालण्यासंबंधीचे कुठलेही ठोस पावले उचलले नाही तर आजही काही पॉश फॉर्म हाऊस वर बिनधास्तपणे देहव्यावसाय सुरू आहे हा व्यवसाय उघड नसला तरी छुप्यापद्धतीने सुरू असलेल्या

या व्यवसायावर पोलिसांनी करडी नजर ठेवून या देहव्यावसायाला प्रतिबंध घालने गरजेचे आहे या व्यवसायाने दिवसगाणिक उग्र रूप धारण केले असून यात अनेक महाविद्यालयीन व गरजवंत तरुणी व महिला गुरफटल्या जात आहेत .हा व्यवसाय नजरेपलीकडेचा असल्याने पोलिसही याकडे कानाडोळा करीत असतात , नेमके पोलिसांच्या या भूमिकेमुळे देह व्यवसायाला चालनामिळत आहे .येथे हा प्रकार असाच सुरू राहोल्यास लवकरच मुंबई पुणे सारख्या शहराच्या रांगेत येण्यास वेळ लागणार नाही करितापोलीस प्रशासन व स्थानिक सामाजिक संघटनांनी तसेच सुदान नागरिकांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

या देह व्यवसाया संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांनी पोलीस स्टेशन ला निवेदन सुद्धा देण्यात आले मात्र कारवाही शून्य असल्याने देहव्यावसायला उधाण आले आहे एकीकडे गुन्हेगारी संदर्भात कंबर कसण्यासाठी डीसीपी पथक, डी बी स्कॉड आदी कार्यरत आहेत तरी सुद्धा यांच्या नजरे आड सुरू असलेले देहव्यावसाय पोलिसांना आव्हान देत आहेत

संदीप कांबळे कामठी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement