Published On : Wed, Oct 30th, 2019

कामठी बस स्थानक चौकात गुंडेगिरी वाढीवर

Advertisement

कामठी बस स्थानक चौक सीसीटीव्ही कॅमेरे अभावी असुरक्षित

कामठी प्र 3:ता- दैनंदिन वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणणे तसेच अवैध धंदे, डकैती, जबरी चोरी, वाटामारी, महिला मुलींची छेड, अपघात आदी गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या मुख्य उद्देशाने नागपूर स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत नागपूर शहरात 488 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले ज्यामध्ये 136 मोक्याच्या ठिकाणी तर कामठी शहरात 69 पॉईंट वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या माध्यमातून तिसऱ्या डोळा नजर ठेवीत लक्ष केंद्रित करणार असून याचा शुभारंभ मागील वर्षी 20 सप्टेंबर 2018 ला नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त कार्यालयात पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला मात्र परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बसस्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याने या चौकातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.

या कामठी बस स्थानक चौकात मागील वर्षी युवक कांग्रेस चे माजी शहराध्यक्ष तुषार दावानी यांच्यावर भर चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मागील वर्षी कामठी नगर परिषद चे स्वास्थ्य कर्मचारी कमल बढेल यांच्यावर सुद्धा भर चौकात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. तर यावर्षी नुकतेच गुमथळ्यातील एका शिक्षकाला 2100 रुपयासह दिव्यांग ओळ्खपत्राला बळी पडावे लागले तसेच या बस स्थानक परिसरातील पानठेल्या च्या पाठीमागे काही तरुणाई गांजा स्मोकिंग सह इंजेक्शन चा नशा करीत आहेत इतकेच नव्हे तर काही तरुणी सुद्धा रात्री च्या वेळी या परिसरात सिगारेट स्मोकिंग करताना दिसून येतात तसेच या परिसरात अवैध वाहतुकीला उधाण आला असून वाहतूक व्यवस्था ही अस्तव्यस्त दिसून येते तेव्हा या घटनेला आळा बसवीत गुन्हेगारी परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

कामठी बस स्टँड चौकात नागरिकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असून कामठी हुन नागपूर सह इतरत्र दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी सह नोकर पेशी , खाजगी व्यावसायिक, विद्यार्थी वर्ग, तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात बस तसेच रेल्वे प्रवास तसेच स्टार बस व ऑटो ने प्रवास करण्यहेतु नागरिकांची गर्दी असते तसेच या मार्गावर नजीकच असलेला स्टार बस थांबा, कामठी रेल्वे स्थानक जवळील तीन सीटर ऑटो बस थांबा मुळे नागरिकांची रेलचेल ही मोठ्या प्रमाणात असते तसेच या चौकात असलेल्या चहा, अल्पोहार तसेच वर्तमान पत्र केंद्र असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येत येत असतात या मार्गावर तीन सीटर ऑटोचालकांचा चांगलाच धुमाकूळ असून वाहतूक व्यवस्था अनियंत्रित आहेत तर प्रत्येक ऑटोचालक हा महिन्याकाठी पोलिसांना 2700 रुपये ‘देण’म्हणून बांधून दिले असल्याची चर्चा असून यांना वाहतूक पोलीस विभागाची कुठलीही भीती राहली नाही ज्यामुळे बेशिस्त वाहतूकदार वाहतुकीचे नियम तोडून दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत यासाठी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

या मार्गावर तरुणाई मोठ्या प्रमाणात येत असून चिडीमारी चे प्रमाण वाढीवर आहेत तर पोलिसांच्या अभयपणामुळे कामठी बस स्टँड चौकात गुंडगिरी ही दिवसेंदिवस वाढीवर आहे तर मागील वर्षी एका ऑटोचालकांच्या मनमानीला युवक कांग्रेस चे माजी शहराध्यक्ष बळी पडले यासारख्या प्रकाराला आळा न बसल्यास ही स्थिती कुणाच्या तरी जीवावर बेतणारी ठरू शकते ज्याला कुणी नाकारू शकत नाही. या प्रकारच्या संवेदन स्थिती लक्षात घेता संबंधित पोलीस विभागाने या परिसरात पोलीस गस्त वाढवून या बस स्टँड चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी येथील जागरुक नागरिक करीत आहेत.

संदीप कांबळे कामठी