Published On : Wed, Oct 30th, 2019

पार्किंग , नो पार्किंग चा प्रश्न अजूनही वाऱ्यावर

Advertisement

कामठी :-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला आळा बसत लोकवस्तीतील जडवाहतुक बंदी व्हावी व नागरिकांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या थेट निदर्शनातुन तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अधिसूचनेनुसार शहरातील 7 मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते रात्री साडे सात वाजेदरम्यान जडवाहतुकीस प्रतिबंध शिवाय कामठी शहरातील 8 स्थळी पार्किंग व 3 स्थळी नो पार्किंग झोन निर्माण करण्याच्या आदेशितावरून नगर परिषद च्या वतीने पार्किंग , नो पार्किंग चे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत तसेच जडवाहतुकीस प्रतिबंध असलेल्या ठिकाणी तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र यासंदर्भात स्थानिक पोलीस विभागाच्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहतुकीला बळ मिळत असल्याने नागरिकांना नाहक डोकेदुखीचा त्रास भोगावा लागत आहे

त्याचप्रमाणे या वर्दळीच्या ठिकानातुन एखादया गंभीर अवस्थेतील रुग्णाला उपचारार्थ नेतेवेळी त्या रुग्णाचा रस्त्यातच मृत्यू होण्याच्या स्थितीला नाकारता येत नाही तेव्हा शहरातील पार्किंग व नो पार्किंग च्या दुरावस्थेकडे लक्ष. पुरविणे गरजेचे आहे.

कामठी शहराचा पुढील 20 वर्षाचा विचार करीत तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्या नुसार निर्देशित केलेले पार्किंग नो पार्किंग झोन नुसार पोलीस क्वार्टर टी पॉईंट चौक ते शिवाजी पुतळा चौक , नगर परिषद जुना नका क्र 5 ते वारीसपुरा कडे जाणारा रस्ता, जी एन रोड ते शिव पंचायत मंदिर रस्ता, शहीद स्मारक चौक ते दमडू महाराज चौक, मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल, कोचर बंगला ते राममंदिर मोदी शाळेकडे जाणारा रस्ता,जे एन रोड प्रबुद्धनगर चर्च ते दरोगा मस्जिद कडे जाणारा रस्ता

या सात मुख्य रस्त्यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी साडे सात पर्यंत जडवाहतुकीस प्रतिबंध राहणार आहे तसेच 8 ठिकाणी असलेल्या पार्किंग झोन नुसार मिनी ट्रक, कार इत्यादी वाहने उभी करण्यासाठी रुईगंज मैदान येथील खरेदी -विक्री सोसायटीला लागून असलेला परिसर , मोठ्या वाहनांसाठी जुना नाका क्र 1 जवळील परिसर, तसेच खुले नाट्यगृह , बैलबाजार व त्याबाजूची जागा, ऑटो स्टँड व छोटी वाहनासाठी पासीपुरा मैदान , ऑटोस्टॅण्ड करिता जुना नाका क्र 5 जवळील मोकळी जागा , दुचाकी वाहने व कारसाठी गांधीमंच समोरील जागा तसेच राजू चाटवाले यांच्या दुकानासमोरील जागा , ट्रक व कार तसेच इत्यादी वाहनासाठी आययुडीपी एरिया जागेतील शासकीय मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे तसेच 3ठिकानावरील नो पार्किंग साठी शहीद स्मारक ते दमडू चौक , मेंनरोड मोटर स्टँड चौक ते भाजीमंडी पूल , सरदार वल्लभभाई पटेल चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत ची जागा निश्चिती करण्यात आलेली आहे.यासंदर्भात स्थानिक प्रशासनासह जनजागृती सह तशी सोय सुद्धा करण्यात आली आहे मात्र बेशिस्त वाहतूक दारांच्या वतिने नियमाला बगल देत असल्याने शहरातील पार्किंग व नो पार्किंग चा प्रश्न वाऱ्यावर असल्याचे दिसून येते ज्याकडे पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

संदीप कांबळे कामठी