नागपूर : शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. मेट्रो स्पा हेल्थ अँड वेलनेस सेंटर फॉर यूनिसेक्स येथे छापा टाकून पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई दि. 14 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4.21 वाजता ते रात्री 8.47 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. टुरिस्ट प्लाझा बिल्डिंगमधील शॉप नंबर 4/5, दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मेट्रो स्पा सेंटरमध्ये ही देहव्यापार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून छापा मारला. त्यात आरती अक्षय मरसकोल्हे (वय 30, रा. गोपाल नगर, नागपूर) या महिलेची अटक झाली. तिच्याविरुद्ध कलम 143(2) भारतीय न्याय संहिता व पिटा अॅक्टच्या कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला.एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹37,730 इतकी आहे.
पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच, आरोपी, पीडित महिला आणि मुद्देमाल सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.