Published On : Fri, Jun 2nd, 2023

वाठोड्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांना अटक तर दोघींची सुटका

Advertisement

नागपूर : वाठोडा परिसरात देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश कारण्यात आला आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी युनिटने (एएचटीयू) बुधवारी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली. तर दोन मुलींची सुटका केली. त्यातील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

विद्या धनराज फुलझेले (वय 42, रा. न्यू शंकर नगर, वाठोडा), सीमा सुधाकर सहारे (वय 31, रा. राऊत नगर), सुधाकर श्रीराम नरुळे (५१, रा. आनंद नगर, हुडको कॉलनी, जरीपटका) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सीमा आणि सुधाकर यांच्या संगनमताने विद्या तिच्या घरी देहव्यापार चालवत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे एएचटीयूने एका ग्राहकाला विद्याच्या घरी पाठवले. आरोपी सेक्स रॅकेट चालवत असल्याचे काळातच एएचटीयूच्या पथकाने नी घरावर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी दोन्ही मुलींची सुटका केली.

एएचटीयूने विद्या, सीमा आणि सुधाकर यांना वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले. ज्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 370, 34, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 4, 8, 12 आणि कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा नोंदवला. अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या 7 नुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

डीसीपी (डिटेक्शन) मुम्माका सुदर्शन यांच्या देखरेखीखाली पीआय सरीन दुर्गे, एपीआय रेखा संकपाल, एपीआय समाधान बलबाजकर आणि आदींनी हा छापा टाकला.