Published On : Sat, Jun 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तरुणींना पैशांचे आमिष दाखवून व्यवसायात ढकलणाऱ्या दोघींना अटक

Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील देहव्यापाराच्या संघटित रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत नंदनवन परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत देहव्यापार चालविल्याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन येथील एनआयटी कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंच आणि बनावट ग्राहकाच्या (डिकॉय पंटर) मदतीने नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बनावट ग्राहकासाठी तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी आणि पैशांची बोलणी सुरू होताच पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत शालिनी उर्फ वर्षा चंद्रशेखर वंजारी (३५) आणि अर्चना शेखर वैश्यमपायन (४३) या दोन महिलांना अटक करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपी महिला आर्थिक फायद्यासाठी तरुणींना कमी वेळात जास्त पैसे मिळण्याचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांची व्यवस्था करून देणे तसेच त्यासाठी फ्लॅट उपलब्ध करून देण्याचे काम त्या करत असल्याचा आरोप आहे.

Advertisement

या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १४३ (२) (३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना आवश्यक कायदेशीर संरक्षण देत त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा शोधही सुरू असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ #Crime #NagpurCrime #HouseTheft #News

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges